बोकळझर गावाची माहिती
बोकळझर हे गांव रंगावली नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक छोटेसे गांव महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यातील एक प्रगतशील व कृषिप्रधान असे गांव आहे. नवापुर पासुन दक्षिणेला ८ किमी अंतरावर नवापुर पिंपळनेर राज्य मार्ग क्र. १३ या रस्त्यापासुन पुर्वेला १ किमी अंतरावर गांव आहे. जिल्ह्याच्या ठिकाणापासून ७२ किमी अंतरावर आहे. ग्रामपंचायतीची स्थापना दिनांक – ०५/०६/१९७२ मध्ये झालेली आहे. सन – २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ८३४ असुन पुरुष – ४१६ व स्त्री – ४१८ इतकी लोकसंख्या आहे. गावात एकुण २६५ कुटुंबे आहेत.गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इ. १ ली ते इ. ७ वी पर्यंत असुन ती शाळा डिजिटल करण्यात आली आहे. तसेच देवमोगरा माता माध्यमिक विद्यालय इ.५ वी ते इ.१० वी पर्यंत आहे.तसेच गावात दोन अंगणवाडी केंद्र असुन दोन्ही अंगणवाडी डिजिटल व CCTV च्या निगराणीत आहेत. ग्रामपंचायतीला सन- २०१७ -१८ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पंचायतराज आवार्ड ,सन- २०१७/२०१८ मध्ये जिल्हास्तरीय स्मार्ट विल्हेज पुरस्कार , सन -२०११-२०१२ राज्यस्तरीय दुसरा क्रमांक संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार तसेच सन- २०२३-२०२४ या वर्षात जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार , सन- २०२२/२०२३ मध्ये तालुकास्तरीय स्मार्ट विल्हेज पुरस्कार मिळाला आहे.
गावाचा मुख्य व्यवसाय शेती असुन शेतात ऊस ,मका ,सोयाबीन ,भात ,भुईमुग,भाजीपाला इ.पिके घेतली जातात.तसेच शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्धव्यवसाय केला जातो. तसेच गांवा शेजारी हिंदळा देवी माता मंदिर तिर्थक्षेत्र असुन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात ८ ते १० दिवस यात्रा भरते .गावात एक गांव एक गणपती दरवर्षी नियमित बसविण्यात येतो.